indian flag

animated-india-flag-image-0004

शिवजयंती २०२१

शिवजयंती २०२१
आज दि १९फेब्रुवारी २०२१ रोजी शिवजयंती साजरी केली

दि १९ फेब्रुवारी २०२१

छ. शिवाजीमहाराज जयंती

रामायण, महाभारतात विविध राजांचे दाखले दिले जातात. हे राजे शूरवीर होते, दानशूर होते, न्यायी होते. पण महान, पराक्रमी राज्यांची परंपरा आपल्याला लाभली असली तरी रयतेचा राजा असं म्हटलं की समोर छत्रपती शिवाजी महाराजांशिवाय दुसरं कुठलं नाव येत नाही. रयतेचा राजा कसा असावा याचा पायंडा छत्रपतींनी रचला आणि त्यापुढे जाण्याची कोणाची टाप नाही जिद्दीने, चातुर्याने आणि बुद्धी वापरून शिवाजी महाराजांनी समस्यांवर मात करत प्रचंड यश संपादन केले आणि स्वराज्याची स्थापना केली.


शिवाजी महाराजांनी स्वराज्यात स्त्रियांवर अन्याय, अत्याचार व हिंसाचार करणाऱ्यांना व त्रास देणाऱ्यांना कठोर शिक्षेची तरतूद केली होती. महिलांना त्रास देणाऱ्यांना शिवाजी महाराजांनी कडक शासन केल्याची अनेक उदाहरणे देता येतील. शिवाजी महाराजांच्या दरबारात सुनावणीसाठी आलेले प्रकरण तातडीने, समोरासमोर तडीस नेले जायचे. 

शाळेमध्ये यावेळी छ. शिवाजी महाराज यांच्या कार्यची माहिती देण्यात येऊन छ. शिवाजी महाराज यांच्या तसबिरीचे पुजन करण्यात आले.



शिवमामेचे पुजन शालेचे मुख्याध्यापक श्री के. बी.पाटील सर यांच्या हस्ते करण्यात आले.


.



 यावेळी मुख्याध्यापक के बी पाटीलसर, पाटोले मँडम,के बी पाटील सर,सोनवणे सर व विद्यार्थी उपस्थित होते.
कोरोनाच्या पारश्वभुमीवर इयत्ता ५ वी ते ७ वी वर्ग चालू आहेत

थोडे नवीन जरा जुने