डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम
डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा जन्म १५ ऑक्टोबर १९३१ साली तामीळनाडू राज्यातील रामेश्वर शहरातील धुनषकोड़ी गावात एका मच्छीमार कुटुंबात झाला होता.त्यांचे पूर्ण नाव अवुल पकिर जैनुल्लाब्दीन अब्दुल कलाम होते. ते त्यांच्या परिवारातील जैनुलअबिदीन आणि अशिअम्मा यांचे सर्वात लहान संतान होते.
अब्दुल कलाम यांच्या वडिलांची आर्थिक परिस्थिती बेताची नव्हती. त्यामुळे त्यांचे वडिल मच्छीमार लोकांना आपली नाव भाड्याने देऊन आपल्या परिवाराचे पालनपोषण करीत असत.अब्दुल कलाम हे त्यांचा परिवारातील सर्वात लहान सदस्य होते. त्यांना तीन मोठे भाऊ आणि एक लहान बहीण होती. घरची आर्थिक परिस्थिती हलाकीची असल्यामुळे त्यांना सुरवातीपासूनच खूप परिश्रम करावे लागले होते.आपली खालावलेली परिस्थिती पाहून ते कधीच गडबडले नाहीत. याउलट ते त्यांच्या अंगी असलेल्या दृढनिश्चय सोबतच प्रामाणिकपणे मेहनत करीत आलेल्या परिस्थितीशी संघर्ष करत राहिले. अश्याप्रकारे समोर जाऊन त्यांनी आपल्या जीवनात फार मोठे यश सम्पादन केले.
अब्दुल कलाम यांनी शिक्षणासाठी केलेले संघर्ष
कलाम आपले शालेय शिक्षण घेत असतांना पेपर वाटायचे काम करीत असत,आणि त्यातून मिळणाऱ्या पैस्यातून ते त्यांचा शालेय खर्च भागवत असत.कलाम यांनी त्यांचे सुरवातीचे शालेय शिक्षण रामनाथपुरम स्च्वार्त्ज़ मैट्रिकुलेशन शाळेत पूर्ण केले.यानंतर त्यांनी आपले महाविद्यालयीन शिक्षण १९५० साली तामिळनाडूतील तीरुचीरापिल्ली येथे असणाऱ्या सेंट जोसेफ्स महाविद्यालया मधून भौतीकशास्त्र विषयाची पदवी घेतली.आपले महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केल्यानंतर अब्दुल कलाम यांनी १९५४ ते १९५७ च्या कालावधी दरम्यान मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (MIT) मधून एरोनॉटिकल इंजिनियरींग मध्ये डिप्लोमा केला होता.अश्या प्रकारे त्यांनी कठिण परिस्थिती असतांना देखील आपले शिक्षण घेणे सुरूच ठेऊन काही कालावधी नंतर, अब्दुल कलाम यांनी भारताचे सर्वात महान वैज्ञानिक च्या रुपात आपली ओळख संपूर्ण जगाला करून दिली.
अब्दुल कलाम यांनी भारतातील सर्वात सर्वोच्च पद असणारे देशाचा पहिला नागरिक म्हणून राष्ट्रपती पद भूषविले होते. ते पहिले असे राष्ट्रपती होते ज्यांचा राजकारणाशी काहीच सबंध नव्हता.
अतिशय प्रभावशाली व्यक्तिमत्व असणारे अब्दुल कलाम यांनी आपले शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी सर्वप्रथम “संरक्षण संशोधन आणि विकास संस्था” (डीआरडीओ) मध्ये वैज्ञानिक म्हणून काम सुरु करून आपल्या कारकिर्दीला सुरवात केली होती.
अब्दुल कलाम यांची विचारर्श्रेणी खूपच दूरवरची असल्याने ते नेहमीच काही तरी नविन आणि मोठ करण्याचे उद्देश्य आपल्या मनाशी बाळगत असत.त्यांनी आपल्या वैज्ञानिक्तेच्या कारगीर्दीत सुरवातीलाचा एका छोट्याशा हेलिकॉप्टर चे डिजाईन तयार करून लोकांमध्ये स्वतःचा ठसा उमटून दिला होता.“संरक्षण संशोधन आणि विकास संस्था” (DRDO) येथे काही काळ नौकरी केल्यानंतर ते “इंडियन कमेटी फॉर स्पेस रिसर्च” चे सदस्य सुद्धा राहिले होते.यानंतर १९६२ मध्ये ते भारताचे महत्वपूर्ण संगठन असलेल्या “भारतीय अंतरीक्ष अनुसंधान संगठन” (ISRO) सोबत जुळले होते.१९६२ पासून १९८२ च्या कालावधी पर्यंत ते इस्रो सोबत जुळलेले होते, या दरम्यान त्यांनी अनेक महत्वाची पदे सांभाळली होती.अब्दुल कलाम यांना भारताच्या सेटैलाइट लॉन्च व्हीकल परियोजनेच्या निर्देशक पदाच्या कार्यभाराची जबाबदारी देण्यात आली होती.अब्दुल कलाम हे त्याठिकाणी प्रोजेक्ट डायरेक्टर च्या पदावर कार्यरत असतांना त्यांनी भारतात आपले पहिले “स्वदेशी उपग्रह प्रक्षेपण यान SLV3” तयार केले होते. यानंतर या यानाला १९८० मध्ये पृथ्वीच्या कक्षे जवळ स्थानापन केले होते.
अब्दुल कलाम यांच्या या यशस्वी प्रयोगानंतर त्यांना भारताच्या “अंतरराष्ट्रीय अंतरिक्ष क्लब” चे सदस्य बनविण्यात आले.विलक्षण प्रतिभावंतांचे धनी असणारे अब्दुल कलाम यांनी “स्वदेशी गाईडेड मिसाईल” चे डिजाईन तयार केले होते. या डिजाईन साठी त्यांनी पूर्णपणे स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर केला होता.स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापरत करून त्यांनी अग्नी आणि पुर्थ्वी सारख्या मिसाईल तयार करून, त्यांनी फक्त विज्ञान क्षेत्रांतच आपले महत्वपूर्ण योगदानच नाही दिले तर, त्यांनी भारत देशाला संपूर्णपणे तांत्रिकदृष्ट्या संपन्न राष्ट्र बनविण्यासाठी देखील आपले महत्वपूर्ण योगदान दिले होते.
यानंतर १९९२ पासून १९९९ च्या कालावधी दरम्यान जेव्हा केंद्रात अटल बिहारी वाजपेयी यांची सत्ता होती. त्यावेळेला डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनी भारताचे रक्षा मंत्री यांचे रक्षा सल्लागार म्हणून देखील काम केले होते.याचदरम्यान अब्दुल कलाम यांच्या निर्देषणात दुसऱ्यांदा राजस्थान मधील पोखरण या ठिकाणी अणूच्या यशस्वीपणे चाचण्या घेण्यात आल्या होत्या.
अश्यातऱ्हेने भारत देश अण्वस्त्र निर्मिती करणारा, अणुशक्ती संपन्न आणि समृद्ध देश बनला.
डॉक्टर ए. पी. जे. अब्दुल कलाम यांना १९८२ साली ”डीफेन्स रिसर्च डेवलपमेंट लेबोरेट्री”(DRDL) चे संचालक बनविण्यात आले होते. याच दरम्यान त्यांना “अन्ना युनिवर्सिटी ” तर्फे डॉक्टर ही पदवी देऊन गौरविण्यात आले होत.
दूरदृष्टी विचारशैलीचे व्यक्तिमत्व असणारे अब्दुल कलामांच्या नेतुत्वात सण १९८८ साली पृथ्वी, सण १९८५ मध्ये त्रिशूल आणि सण १९८८ मध्ये “अग्नी” क्षेपणास्त्रांची चाचणी घेण्यात आली होती.तसेच अब्दुल कलामांच्या अध्यक्षतेत आकाश, नाग नावाची क्षेपणास्त्र सुद्धा बनवण्यात आली होती.आज त्यांची ख्याति “मिसाइल मॅन” च्या रुपाने जगाच्या चोहो दीशांना पसरलेली आहे.
मृत्यू तिथी(Death)२७ जुलै २०१५, शिलांग, मेघालय