मेंढी व धनगर
एक धनगर आपल्या मेढ्यांची लोकर काढून घेत असता, 'तू आमची सर्व लोकर काढून घेतोस, हे बरे नव्हे.' अशी एका मेंढीने तक्रार केली. ती ऐकून धनगराला तिचा इतका राग आला की, त्या भरात त्याने तिचे एक कोकरू ठार मारले. ते पाहून मेंढी त्याला म्हणाली, 'तुझ्या क्रूरपणाचा धिक्कार असो.' हे तिचे बोलणे ऐकून धनगर अधिकच रागावला व म्हणाला, 'एवढ्याने काय झालं?' माझ्या मनात आलं तर तुलादेखील मी ठार मारीन अन् शिकारी कुत्रे नि लांडग्यांना देऊन टाकीन.' धनगराचे हे बोलणे ऐकून हा बोलल्याप्रमाणे केल्याशिवाय रहाणार नाही या भितीने बिचारी मेंढी गप्प राहिली.
तात्पर्य - सत्ता व बळ यापुढे शहाणपण फारसे चालत नाही हेच खरे.