दि २३ जानेवारी २०२०
नेताजी सुभाषचंद्रबोस जयंती
सुभाषचंद्र बोस (जानेवारी २३, इ.स. १८९७ - ऑगस्ट १८, इ.स. १९४५) हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक अग्रेसर नेते होते. त्यांना नेताजी सुद्धा म्हटले जाते. दुसरे महायुद्ध सुरू असताना इंग्रजांशी लढण्यासाठी त्यांनी जपानच्या मदतीने आझाद हिंद फौज स्थापन केली होती.त्यांनी दिलेला जय हिंदचा नारा हा आज भारताचा राष्ट्रीय नारा बनला आहे. त्यांनी "तुम मुझे खून दो मैं तुम्हे आजादी दूंगा" असे भारताला आवाहन दिले