"दि काॅन्झर्वेशन फौंडेशन ऑफ इंडिया" च्यावतीने ढाकाळे विद्यामंदिरच्या मुलांना "स्कुलबॅग" वाटप
दि २७ नोव्हेंबर २०२१
कु.वृषभ गौतम ठक्कर यांचे वाढदिवसा निमित्त,"दि काॅन्झर्वेशन फौंडेशन ऑफ इंडिया"च्या वतीने विद्यामंदिर ढाकाळे येथे शालेय विद्यार्थ्यांना स्कुल बॅग वाटप करणेत आले.कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी श्री आशिष घेवडे हे होते.
यावेळी बोलताना श्री घेवडे म्हणाले की,ग्रामीण भागातील गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत केली पाहिजे. या मुलांना चांगले शिक्षण मिळाले तर उच्च पदावर जातील. गरीब मुलांना मदत करणे हे सर्वात पुण्याचे काम आहे.
सामाजिक कार्यकर्ते मा.गौतम ठक्कर,सौ मानसी गौतम ठक्कर व भुषण ठक्कर यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम शाळेमध्ये घेण्यात आला.
ही संस्था नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असते याची प्रचिती पुन्हा एकदा ढाकाळे ग्रामस्थांना अनुभवायला मिळाली.याअगोदर कोरोना लाॅकडाउन काळात त्यांनी ग्रामस्थांना धान्य वाटप केले होते.तसेच २७ सप्टेंबर २०२१श्री. पवार यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना शालोपयोगी साहित्य व खाऊ वाटप करण्यात आले होते.
आज दिनांक २७ नोव्हेंबर २०२१ रोजी" दि काॅन्झर्वेशन फौंडेशन ऑफ इंडियाच्या" वतीने ढाकाळे गावातील पहिली ते सातवी इयत्ता मधील विध्यार्थ्याना स्कुल बॅग वाटप करण्यात आले. प्रत्येक विध्यार्थ्याला एक स्कुल बॅग व खाऊ वाटप करण्यात आले. आज संस्थेच्या वतीने जवळपास ६५ विध्यार्थ्याना वाटप करण्यात आले.
याप्रसंगी फौंडेशनचे पदाधिकारी उपस्थित होते.
फौंडेशनच्या वतीने भविष्यातही या भागातील विध्यार्थ्याना अशीच मदत केली जाईल याची ग्वाही ठक्कर यांनी दिली.
याप्रसंगी शाळा व्यवस्थापनचे अध्यक्ष व उपाध्यक्ष,व ग्रामस्थ शिक्षक स्टाफ उपस्थित होते.
वृक्षारोपण |
यावेळी पाहुण्यांच्या हस्ते शाळेच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आले.