indian flag

animated-india-flag-image-0004

शाळेचे वनभोजन

शाळेचे वनभोजन

दि १० जानेवारी २०२३
शाळेला कधीकधी दांडी मारणारी मुले तर सकाळी नऊलाच शाळेत हजर.रंगीबेरंगी पोशाख केलेली ही मुले फुलपाखरां सारखी आज सुंदर दिसत होती. सगळी मुले आपापल्या तयारीने आली होती .खेळायला लागणारे साहित्य,जेवणाचे डबे घेऊन आपल्या साहीत्यासह त्यानी  मसोबावाडी येथील मसोबा मंदिर परिसराकडे निघाली.
शाळेचे वनभोजन ढाकाळे विद्यामंदिर

निसर्ग सौंदर्य न्याहाळत मुले मंदिर परिसरात पोहचली.मंदिर परिसरातील महाकाय वृक्ष,त्यावर आढळणारी बांडगुळा सारखी परजीवी वनस्पतींची माहिती घेत मुले तेथील गार सावलीत विसावली.
शाळेचे वनभोजन ढाकाळे विद्यामंदिर

देवदर्शन घेऊन मुलानी क्रिकेट, लगोरी असे आवडीचे खेळ सुरु केले. मुले खेळण्यात दंग झाली. खेळ संपल्यावर मुलांच्या पोटात भुकेने कावकाव सुरुच केले होते. मुलांची पंगत रांगेत बसली आणि त्यांनी घरून आणलेल्या डब्यावर ताव मारला. वनभोजनातला आनंदाचा परमोच्च बिन्दू! सर्वाना सदैव आठवणीत राहणारा होता.

जेवणानंतर सर्वांची गायनाची मैफिल जमली. गाण्याचा भेंड्या सादर करताना मुलांचा उत्साह दिसून येत होता.मुले आपल्या आवडीची पारंपरिक गाणी, कविता,चित्रपटातील गाणी गाऊ लागली. तिसरीतल्या छोट्या तन्वीने डान्सवर  सर्वांची वाहवा मिळवली. दुपारी साडेतीन वाजता सर्वानीच परतीची वाट धरली पण पाऊले पुढे जाता जाता मन मात्र चालत होते त्या वनातील भोजनाची आठवण साठवूनच. 

थोडे नवीन जरा जुने