दिव्याच्या प्रदर्शनाने अमावस्या साजरी
गुरूवार दि २८ जुलै २०२२
आषाढ महिन्यात येणारी अमावस्या म्हणजे आषाढी अमावस्या याला दीप अमावस्या असे ही म्हणतात.
आषाढ अमावस्या ही चातुर्मासातील पहिली अमावस्या असं मानलं जातं. श्रावण महिन्याला सुरुवात होण्याच्या आदल्या दिवशी अमावस्या येते.
कुठल्या ना कुठल्या रुपात दिवा आपल्याला प्रकाश देत असतो. या दिव्याप्रती कृतज्ञता म्हणून दीप अमावस्या साजरी केले जाते.भारतीय संस्कृतीमध्ये दिवा, ज्योती, फुलवात, वात यांना फार महत्त्वाचे स्थान आहे.
शाळेत आज सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या घरातुन पणती,समई आणुन दीपअमावस्या साजरी केली.
यावेळी मुलांना दीपअमावस्याची माहिती सांगण्यात आली.
दीप सूर्याग्निरूपस्त्वं तेजस: तेज उत्तमम ।
गृहाणं मत्कृतां पूजा सर्व कामप्रदो भव:॥