indian flag

animated-india-flag-image-0004

वि. म. ढाकाळे-स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव

 

वि. म. ढाकाळे-स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव

  • अमृत महोत्सव 
  • पहिला दिवस

यावर्षी १५ ऑगस्ट २०२२ रोजी आपल्या भारताला स्वातंत्र्य होऊन ७५ वर्ष पुर्ण होत असून त्यानिमित्त आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा ( आजादी का अमृत महोत्सव ) करत असून त्यानिमित्त १३ आॉगष्ट २०२२ रोजी या कार्यक्रमाचा पहिला दिवस आहे. 

या दिवशी सकाळी ७:३० वाजता शाळेच्या पटांगणात भादोले येथील माजी सैनिक श्री  नितीन कदम यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. 

ध्वजारोहणानंतर  राष्ट्रगीत म्हणण्यात आले.

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव - ढाकाळे शाळा

यावेळी बोलताना श्री कदम म्हणाले की, 'तिरंगा' आपल्या देशाचा अभिमान व सन्मान आहे. आपला राष्ट्रध्वज आपल्यासाठी धैर्याचे व प्रेरणेचे प्रतीक आहे. तिरंगा आपल्या स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदानाची आठवण करून देतो.

यावेळी मुख्याध्यापक श्री के बी पाटील सर यांनी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले. विद्यार्थ्यांनी यावेळी स्वातंत्र्या विरांच्या गोष्टी सांगितल्या. या कार्यक्रमास ढाकाळे गावातील नागरिक, पालक व शाळेतील अध्यापक वर्ग उपस्थित होता.

थोडे नवीन जरा जुने